मुख्य सामग्रीवर वगळा

भटका विमुक्त संघर्ष समिती व पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड व सहाय्यक पोलीस निरीक्षक शहाजी शेळके महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित.

 मुंब्रा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड व सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. शहाजी शेळके यांना  भटका विमुक्त समाज संघर्ष समिती व  पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र राज्य यांचे वतीने श्री विकास जगताप यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Award

Through Bhatka Vimukta Sangharsh Samiti and Patrakar Suraksha Samiti, Senior Inspector of Police Shri.  Madhukar Kad and Assistant Inspector of Police Shahaji Shelke honored with Maharashtra Bhushan Award.

जगभरामध्ये धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना कोव्हिड-19  महामारीच्याया संकट काळामध्ये दिवा मुंब्रा शहरामध्ये या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी आपल्या जीवाची बाजी लावत संचारबंदी, लॉकडाऊन बाबत कडक भूमिका घेऊन कोरोणा महामारीच्या प्रसाराला प्रतिबंध घातला. व पुन्हा एकदा आपल्या खाकीतील देव माणसाचे दर्शन समाजास घडविले, व आपल्या कार्याची वेगळीच छाप निर्माण केली, अनेक गुन्ह्यांचे तपास काही क्षणातच लावले कर्तव्यदक्ष पोलिस अधिकाऱ्यांनी या आणीबाणीच्या काळामध्ये  रात्रंदिवस लॉकडाऊन व संचारबंदीच्या नियमांचे अंमलबजावणीसाठी जागता पहारा देऊन प्रसंगी संचारबंदीचे नियम मोडनाऱ्यांवर कायद्याचा बडगा उगरलाला जात होता. 

ज्या ठिकाणी कोरोणांचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले त्या ठिकाणी रेडझोनची कडक अंमलबजावणी करून सर्वसामान्य जनतेला त्याचा नाहक त्रास होऊ नये याची पुरेपूर दक्षता घेतली, यावेळी कोरोना बाबत चुकीची माहिती अफवा पसरू नये म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने जनजागृती केली, तसेच दिवा मुंब्रा येथे भाजीपाला असो अथवा जीवनाशक्य वस्तू असो रुग्ण असो याबाबत कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याविषयी सुद्धा त्यांनी पुरेपूर काळजी घेतली. व या समाजासमोर महाराष्ट्रासमोर महाराष्ट्र पोलिसांनी माणुसकी जोपासत पोलिसांचा एक वेगळा आदर्श उभा केला. 

यावेळी भटक्या व विमुक्त समाज संघर्ष समितीचे अध्यक्ष  व पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र राज्यचे श्री.विकास जगताप म्हणाले की प्रशासनाच्या सेवेमधील निस्वार्थी प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यांना  या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहिलेल्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्यासाठी भटका विमुक्त संघर्ष समिती व पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र  यांनी उचललेले पाऊल हे आता केवळ सोहळा नव्हे, तर पोलीस प्रशासन व जनता यांचे संबंध गौरवशाली परंपरा बनू पाहात आहे.

लोकसेवा-समाजसेवा परफॉर्मिंग आर्ट्स, कला, क्रीडा रंगभूमी, मराठी चित्रपट,उद्योग पायाभूत सेवा, राजकारण, प्रशासन (आश्वासक) यातील एकंदर १३ कॅटेगरींसह वैद्यकीय क्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या १४ पुरस्कारांच्या व्यतिरिक्त स्पर्धेच्या पलीकडे जाणारे उत्तुंग कर्तृत्व सिद्ध केलेल्या सहा महनीय व्यक्तींना विशेष पुरस्कार दिला जाणार आहे. याचे सर्व महाराष्ट्रातील पत्रकारांकडून व पोलीस प्रशासनाकडून जनतेकडून स्वागत होत आहे.

मुंबई महाराष्ट्राच्या पोलीस दलाची स्वतःची स्थिर आणि स्थायी रचना तसेच व्यवस्था आहे . या रचनेत जसे अस्वाभाविक काम करणारे काही अधिकारी आहेत तसेच एका निष्ठेने आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणारे सर्वसामान्य पोलीसही आहेत . हे सामान्य पोलीसच पोलीस दलाचा खरा कणा आहेत .

पोलीस यांनी कोरोना व लॉकडाऊनच्या काळात शहरातील कायदा व सुव्यवस्था तसेच मदतकार्यात बजावलेल्या असामान्य कामगिरीला भटक्या व विमुक्त संघर्ष समिती / पत्रकार सुरक्षा समितीच्या समाजाच्या वतीने सलाम.

 संकट काळात जनसामान्यांच्या मदतीला धावून जाण्याची आपली महाराष्ट्र पोलिसांची संस्कृती व आपल्याला मिळालेली शिकवण या संस्कारामुळेच आपण मदतकार्यात  , जनतेची आस्था व तळमळीमुळे आपण मोठया धैर्याने स्वतःच्या जिवाचा धोका पत्कारुन सामान्यांच्या पाठीशी उभे राहिलात , आपल्या कार्यातून पोलीस प्रशासन व समाजापुढे एक आदर्श उभा राहिला आहे . प्रत्येकाला आपला अभिमान आहे . आपले कर्तुत्व माणुसकी असेच बहरत राहण्यासाठी आपल्याला मनःपुर्वक शुभेच्छा.

पुरस्काराचे वितरण भटका विमुक्त समाज संघर्ष समितीचे/व पत्रकार सुरक्षा समिती चे अध्यक्ष श्री विकास जगताप.(महाराष्ट्र राज्य), 

सोशल मीडिया प्रमुख नितीन चव्हाण.(महाराष्ट्र राज्य)

सोशल मीडिया उपप्रमुख मोहन शिंदे

पश्चिम महाराष्ट्र सोशल मीडिया प्रमुख श्री किसन चव्हाण.

युवा प्रदेशाध्यक्ष श्री गणेश धायगुडे.

पुणे जि प्रमुख विनोद शेगर 

सातारा जिल्हा प्रमुख मंगेश चव्हाण

श्री श्रीदेव शंकर शिंदे सामाजिक कार्यकर्ता (मुंबई)सर्व भटका विमुक्त समाज संघर्ष समितीचे/व पत्रकार सुरक्षा समितीचे  सदस्य.

पुरस्काराचे वितरण भटका विमुक्त समाज संघर्ष समितीचे/व पत्रकार सुरक्षा समितीचे अध्यक्ष श्री विकास जगताप यांनी केले.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भटक्या-विमुक्तांसाठी भैरव संघर्ष — विजय जाधव यांची प्रेरणादायी वाटचाल

वीस वर्षांचा संघर्ष हजारो कुटुंबांना नवी ओळख पुणे — भटक्या आणि विमुक्त समाजाच्या जीवनात ओळखपत्रे, शिक्षण, रोजगार आणि सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे संघर्ष करावा लागतो. अशा परिस्थितीत समाजाला दिशा देणारे आणि त्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणजे जय भैरवनाथ सामाजिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. विजय जाधव. वीस वर्षांची सक्रिय वाटचाल गेल्या दोन दशकांपासून जाधव समाजकार्यात सक्रीय असून भाषणापुरते नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून बदल घडवण्यावर त्यांचा भर आहे. लहानशा गावातून सुरुवात करून त्यांनी जिल्ह्यापासून राज्यपातळीपर्यंत समाजाचा प्रश्न पोहोचवला आहे. "समाजाने दिलेले प्रेम हेच माझे खरे बळ" असे ते नेहमी सांगतात. १५०० कुटुंबांना जातीचे दाखले अलीकडील उपक्रमात त्यांच्या नेतृत्वाखाली १५०० भटक्या-विमुक्त कुटुंबांना जातीचे दाखले मिळाले. हा केवळ कागदाचा तुकडा नसून — शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि सरकारी योजनांची दारे खुली करणारी सुवर्णकिल्ली ठरली. महसूल विभाग, जिल्हा प्रशासन, पोलिस खातं ...

"अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समिती व अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ यांनी वारंवार पाठपुरावा केल्यामुळे अखेर पाठपुराव्याला यश!"

अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समितीच्या पाठपुराव्याला यश; महामंडळाच्या नावात बदलास शासनाची अधिकृत मंजुरी मुंबई | ४ ऑगस्ट २०२५ महाराष्ट्र शासनाच्या इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागाने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समिती व अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ यांच्या संयुक्त प्रयत्नांना मोठे यश प्राप्त झाले आहे. पूर्वीचे नाव “परमपुज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ” हे आता बदलून “श्री शिव गोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ” असे करण्यात आले आहे. 📍 १७ जुलै २०१५ रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नावे बदलण्यास मंजुरी, आणि ४ ऑगस्ट २०१५ रोजी शासनाने शुद्धिपत्रक जारी करून निर्णय अंमलात आणला. संघर्ष समितीचा निर्णायक पाठपुरावा या ऐतिहासिक निर्णयासाठी संघर्ष समितीने शासन दरबारी सातत्याने ठोस भूमिका मांडली. समाजाच्या अस्मितेसाठी आणि स्वतंत्र आर्थिक ओळखीच्या मागणीसाठी त्यांनी अखंड प्रयत्न केले. नेतृत्वाचे मोलाचे योगदान या लढ्याच्या यशामागे अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ , (एसीपी नि.) श्री. मछिंद्र बाबुराव चव्हाण , सौ. ...

समाजासाठी झुंजणारा, दबावाला न झुकणारा – नेता असावा तर असा श्री विजयकाका गायकवाड

सातारा जिल्हा ही प्रेरणादायी भूमी जिथून श्री विजयकाका गायकवाड यांनी लोक जनशक्ती पार्टीचे म्हणून आपल्या सामाजिक लढ्याची सुरुवात केली. ही केवळ पदाची नेमणूक नसून, "गोर-गरीब, भटक्या-विमुक्त समाजासाठी मदतीचा हात पुढे करणारे आणि सातत्याने त्यांच्या प्रश्नांवर काम करणारे श्री विजयदादा गायकवाड " सर्व उपेक्षितांचे बुलंद प्रतिनिधी साताऱ्याची भूमी ही लढ्यांची, क्रांतीची आणि परिवर्तनाची भूमी आहे. याच भूमीतून उभे राहिलेले श्री विजयकाका गायकवाड हे भटक्या-विमुक्त, दलित, श्रमिक, महिला आणि तरुण समाजघटकांचे खरे प्रतिनिधी आहेत. ते फक्त वंचितांचे नव्हे, तर सर्व बहुजनांचे बुलंद व्यासपीठ बनले आहेत. साताऱ्याचा वाघ – बेधडक, निर्भीड, तडफदार श्री विजयकाकांचे नेतृत्व हे संयमित, पण अत्यंत ठाम आणि आक्रमक आहे. ते कोणत्याही अन्यायापुढे झुकत नाहीत. त्यांच्या प्रत्येक वक्तव्यात आणि कृतीत साताऱ्याच्या भूमीचा आत्मविश्वास आणि वाघासारखी तडफ दिसते. “मी पक्षासाठी नव्हे, समाजासाठी अध्यक्षपद स्वीकारलं आहे.” – श्री विजयकाका गायकवाड भटक्या-विमुक्त आणि दलित समाजासाठी ठोस...